विधीमंडळ अधिवेशन: ‘शक्ती’ विधेयक सादर

0

मुंबई: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सोमवार  १४ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. शोकप्रस्तावाने सुरुवात झालेली आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोकप्रस्तावावर बोलत आहेत. दिवंगत आमदार, मंत्र्यांना तसेच विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

राज्यातील महिलांवरील अत्याचाराची घटना कमी करण्यासाठी आणि बलात्कारांना शिक्षा देण्यासाठी हैद्राबाद सरकारच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ‘शक्ती’ कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून सुरु झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक सादर करण्यात आले आहे.