विधान परिषद निवडणूक: निकाल स्पष्ट व्हायला रात्र होणार

0

मुंबई: विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ तसेच विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणूकीसाठी झालेल्या मतदानाची आज गुरुवारी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी सुरू आहे. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार माजी मंत्री अमरीश पटेल विजयी झाले आहे. मात्र पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची मतमोजणी सुरु आहे. मतमोजणी सकाळपासून सुरु आहे, बॅलेट पेपरचे गठ्ठे तयार झाले असून आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत सुरुवातीचे कल हाती येतील तर रात्री उशिरापर्यत निकाल स्पष्ट होणार आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या विरोधात एकमेव भाजप असल्याने महाविकास आघाडीचा विजय निश्चित मानला जात आहे, मात्र आज हे स्पष्ट होईल.

Copy