विधान परिषद: कॉंग्रेसची यादी रखडल्याने मंत्रिमंडळची बैठक लांबणीवर

0

मुंबई: राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागांसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. आज बुधवारी मंत्रिमंडळ बैठक बोलविण्यात आली होती, त्यात १२ नावे निश्चित केले जाणार होते. मात्र कॉंग्रेसकडून संभाव्य यादी तयार करण्यास विलंब होत असल्याने आजची मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता उद्या गुरुवारी ही बैठक होण्याची शक्यता आहे. राज्यपाल १२ सदस्यांची आमदार म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करतात, ही नियुक्ती यावर्षी लांबली आहे. राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा संघर्ष देखील यामुळे निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत नावे निश्चित करण्यात येणार असून त्यासाठी राज्यपालांकडे शिफारस करण्यात येणार आहे.

शिवसेनेकडून आदेश बांदेकर, मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री सचिन अहिर यांच्यासह युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री एकनाथराव खडसे, कलावंत आनंद शिंदे, शेतकरी नेते राजू शेट्टी तर कॉंग्रेसकडून माजी आमदार नसीम खान, सचिन सावंत, सत्यजित तांबे यांची नावे चर्चेत आहे.

Copy