विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून राजेश राठोड यांना उमेदवारी

0

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून राजेश राठोड यांना उमेदवारीमुंबई: येत्या 21 में रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. यासाठी जवळपास उमेदवार निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाटेला येणाऱ्या एका जागेवर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने राजेश राठोड यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजेश राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राजेश राठोड हे जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेते आणि मानले जातात. त्यांनी मंठा परतूर विधानसभा मतदार संघातून विधान सभेची निवडणूक लढविली होती. ते तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले असून ते जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती    देखील होते.