विद्यार्थ्यांनी घेतला ‘पोलीस’ बनून कायद्याचा अनुभव

0
भोसरी : भोसरी एमआयडीसी पोलिसांसोबत एक दिवसासाठी विद्यार्थी पोलीस बनले. यावेळी विद्यार्थ्यांनी एफ.आय.आर. नोंदणीपासून ते शेवटपर्यंत चालणारे काम याबाबत पोलिसांची दिनचर्या जाणून घेतली. या कार्यक्रमासाठी भोसरी एमआयडीसी पोलीस चौकीचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक भीमराव शिंगाडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल साळुंखे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ताथवडे येथील जे.एस.पी.एम.च्या एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांनी यावेळी पोलीस बनून कायद्याचे तंत्र समजून घेतले. एफ.आर.आय.म्हणजे काय, पोलीस कसे तपास करतात आदी गोष्टी यावेळी वरिष्ठ पोलिसांनी त्यांना मार्गदर्शन केले.
सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल साळुंखे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, पोलीस खात्याकडून असणार्‍या सुविधा, वाहतुकीचे धडे, एखाद्यावेळी अचानक पोलिसांना कॉल आला तर तातडीने मदत कशी केले जाते याबात सांगितले. इंटरनेट व व्हाटसअप व फेसबुकमुळे होणारी फसवणूक याविषयीही माहिती दिली. पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वप्रथम ही संकल्पना राबवण्यात आली. या कार्यक्रमाची संकल्पना प्रथमेश आंबेरकर व अनिकेत सोनवणे यांची होती. हा कार्यक्रम पोलीस नागरिक मित्र संस्था व राहुल श्रीवास्तव यांच्या सहकार्याने पार पडला. यावेळी कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर विटकर, प्रिन्सिपल डॉ.आर.के.जैन, डॉ.अमेय चौधरी, प्रा.डॉ.मीनाक्षी दुगाल, प्रा.डॉ.विजयश्री मेहता, प्रा.दीपाली सुराणा, प्रा.आशा किरण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अभिजीत प्रधान यांनी केले, तसेच कार्यक्रमाची सांगता कासारसाई येथील घडलेल्या प्रकाराबद्दल निषेध करत श्रद्धांजली वाहण्यात आली.
Copy