विद्यार्थ्यांनी आयुष्यात कोणत्याही व्यसनाला बळी पडता कामा नये

0

खिर्डी । देवाने दिलेले आयुष्य खुप सुंदर आहे. त्यात आपण व्यसन हा प्रकार बाजूला ठेवावा. राष्ट्रपुरुष यांचा आपण सन्मान करतो. परंतु आपल्या कर्तुत्वाने आपल्यासोबत असतात आई, वडिलांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. आपण सुसंस्कृत झाले पाहिजे असे प्रतिपादन महामंडलेश्‍वर जर्नादन हरिजी महाराज यांनी केले. येथील माध्यमिक व कनिष्ट महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

सरस्वती पुजनाने कार्यक्रमास सुरुवात

सर्वप्रथम दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमा पूजन सतपंथरत्न आचार्य महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी महाराज यांच्या हस्ते व विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. संदीप भंगाळे व चेअरमन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला.

आई, वडीलांच्या कष्टाला आपण जाणून घ्यावे

जर्नादन महाराजांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आर्य चाणक्य यांची सुंदर गोष्ट सांगितली. त्यात आर्य चाणक्यचे मातृप्रेम सांगितले. आई, वडील यांच्या कष्टाला आपण जाणून घेतले पाहिजे. आपल्यासाठी हिरो स्वामी विवेकानंद आहे, छत्रपति शिवाजी महाराज आहे, देशाचे सैनिक जवान आहे, असे म्हणत विद्यार्थ्यांनी कोणतेही व्यसन आयुष्यात येवू देता कामा नये, असे मोलाचे मार्गदर्शन केले.

नृत्य कार्यक्रम

त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले सुप्त गुण दाखवत ईशस्तवन करुन गाण्यांवर नृत्य सादर केले. मुख्यध्यापक यांनी प्रस्तावना मांडली.

यांची होती उपस्थित

यावेळी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. संदीप भंगाळे व सदस्य दत्तात्रय महाजन, भास्कर भंगाळे, अनिल लढे, भरत लढे, अनिल चौधरी, धनराज भंगाळे, मुख्याध्यापक एस.एस. सुरदास यांसह शिक्षक वृंद आर.टी. पाटील, एस.के. तायडे, यू.एम. लढे, आर.बी. भोई, एस.व्ही. पाटील, जे.बी. फेगडे, वाय.बी. नेरकर, यु.एन. बंड, जी.एस.चौधरी, जी.एन. पाटील व सिमा महाजन, प्रतिभा पाटील, सुलोचना पाटील, साजिद बेग, दिपक किरंगे, अरुण केदारे, भूषण पाटील, पराग पाटील, दिपाली फेगडे, संदीप धनगर, चारुशीला लढे, प्रवीण अवसरमल, सिध्दार्थ तायडे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन जयश्री चौधरी तर आभार आर.बी. भोई यांनी मानले.