विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याची शिवसेनेची मागणी

0

एरंडोल – परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केल्याप्रमाणे तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्वरित मोफत पास देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे आगारप्रमुख यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. शिवसेनेतर्फे आगारप्रमुख विजय पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, यावर्षी संपुर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला असुन शेतकऱ्‍यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये, म्हणुन सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनिंना मोफत पास देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्वरित मोफत पासचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, विधासभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, तालुका संघटक रवींद्र चौधरी, अमोल भावसार, युवा सेनेचे तालुकाप्रमुख बबलु पाटील यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

Copy