विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण मिळणार

0

धुळे । जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या एकविध खेळाच्या क्रीडा संघटनांचे अध्यक्ष, सचिव यांनी 2016-17 या वर्षात होणार्‍या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी ) परिक्षेस प्रविष्ठ होणार्‍या राज्य/राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य 25 गुण , राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग व राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य 20 गुण, व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना 15 गुण देण्यासाठी क्रीडा संघटनांनी कागदपत्रांसह अहवाल सादर करावयाचा आहे असे जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांनी कळविले आहे.

27 फेब्रुवारीपर्यंत अहवाल द्या
नाईक यांनी म्हटले धर्मदाय आयुक्त यांच्याकडे संस्था नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र, राज्य संघटनेस जिल्हा संघटना संलग्न असल्याचे पत्र, जिल्हा संघटनेची सत्यप्रत, जिल्हास्तर / विभागस्तर क्रीडा स्पर्धेचा संपूर्ण अहवाल, जिल्हा संघटनेच्या गतवर्षाच्या लेखाविवरण पत्राची स्वाक्षरीत प्रत, जिल्हा संघटनेच्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताची स्वाक्षरीत प्रत, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे परिपत्रक, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची प्रवेशिका, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेची भाग्यपत्रिका, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे गुणपत्रक (सांघिक खेळ), राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा वजन गटनिहाय वजन, घेतलेबाबत खेळाडूंची स्वाक्षरी असलेला तक्ता व भाग्य पत्रिका (वैयक्तिक खेळ) राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील थेलेटिक्स व जलतरण स्पर्धांची बाबनिहाय कार्यक्रम पत्रिका, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे अंतिम निकालपत्र, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंच्या याद्या (परिशिष्ट इ) विहित नमुन्यात राज्य संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांची स्वाक्षरी व शिक्का असलेली प्रत, राज्य संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांच्या नमुना स्वाक्षरीचे पत्र द्यायचे आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, देवपूर धुळे यांच्याकडे 27 फेब्रुवारी पर्यंत कार्यालयीन वेळेत कागदपत्रासह अहवाल सादर करावा, असे आवाहन रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी, धुळे यांनी केले आहे.