विद्यार्थी सहाय्यक समितीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत जेवण

0

जळगाव- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरसंचारबंदी असल्याने हॉटेल, खानावळ बंद आहेत. त्यामुळे शहरात शिक्षणानिमित्त थांबून असलेल्या विद्यार्थ्याचे हाल होत आहे. विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था व्हावे यासाठी विद्यार्थी सहाय्यक समितीतर्फे शहरात शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आली आहे. गरजू विद्यार्थ्यांनी पार्सलसाठी धनजी राणे ९३२६७८८६०२ यांच्याशी फोनसंपर्क करुन आपले नांव नोंदवावे असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.