विद्यापीठातील कर्मचार्‍याच्या दुचाकीचा अपघात

0

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जात असलेल्या कर्मचार्‍याच्या दुचाकीला सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास खोटेनगर स्टॉपजवळ कालीपिली गाडीने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार कर्मचारी गंभीर जखमी झाला. मात्र, अपघातानंतर जमावाने कालीपिली गाडी चालकास चोप देत कालिपीलीची तोडफोड केली. जखमी कर्मचार्‍यास खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. रवि फडके हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कामाला आहेत.

सकाळी ते विद्यापीठात जाण्यासाठी दुचाकीने (क्रं.एमएच.19.एडब्लू) घरून निघाले. यावेळी खोटेनगर रिक्षा स्टॉपजवळून जात असतांना त्यांच्या दुचाकीला मागून येणार्‍या भरधाव कालीपिली गाडीने (क्रं. एमएच.19.वाय.5320) धडक दिली. यात रवि फटके यांची दुचाकी घसरून ते फेकले गेले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली. अपघात होताच परिसरात लोकांनी तेथे गर्दी करत कालीपिली चालकाला पकडून ठेवत त्याला चांगलाच चोप दिला. संतप्त लोकांनी कालीपिली मार्शल गाडीची देखील तोेडफोड केली. यानंतर फडके यांना खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.