विद्यापीठाच्या नामविस्तारनिमित्त माहेर ते सार रॅली

0

जळगाव : शासनाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा नामविस्तार केल्यानिमित्त कवयित्री बहिणाबाई आनंदोत्सव समितीतर्फे शनिवारी, ६ आॅक्टोंबर रोजी शहरातून माहेर ते सासर रॅली काढण्यात येणार आहे.  रॅलीला आसोदा गावातून सुरूवात होऊन त्यानंतर जुने जळगावातील चौधरी वाड्यातून रॅली निघेल़ तर शिवतीर्थ मैदानावर या रॅलीचा समारोप होणार आहे.  रॅलीमध्ये सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार असून चित्ररथ, लेझीम पथक, लेवा सम्राज्ञी महिला मंडळाचा विशेष सहभाग असेल़ रॅलीचे उद्घाटन महापौर सिमा भोळे यांच्या हस्ते होणार आहे़ याप्रसंगी कुलगुरू पी. पी. पाटील, प्र-कुलगुरू पी. पी. माहुलीकर, आमदार सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, चंदुलाल पटेल, शिरीष चौधरी यांची उपस्थिती असणार आहे.