विद्यापीठस्तरीय साहस कार्यशाळेचा समारोप

0

फैजपूर (प्रतिनिधी) – येथील तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय व उमवि जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय साहस कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून तापी परिसर विद्यामंडळाचे सचिव प्रा. एम.टी. फिरके, तर अध्यक्षस्थान डॉ. एस.के. चौधरी यांनी भूषविले. प्रास्ताविकात विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.डॉ. गोपाळ कोल्हे यांनी साहस शिबिराचा सविस्तर आढावा घेतला. वनफेरी, पालोबा टेकडी, चढाई, निसर्ग संपदेचा परिचय तसेच मेलबर्न विद्यापीठाचे डीन जॅकसन यांचा विद्यार्थ्यांशी संवाद याबद्दल माहिती दिली.

यावेळी प्रा. सतिश पाटील, प्रा.डॉ. ए.के. पाटील, डॉ. शरद बिर्‍हाडे, स्वप्निल चौधरी, चेतन कोळी, सिध्दार्थ तायडे, अश्‍विनी चौधरी, पुजा चौधरी, विजय धनगर यांनी तसेच कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन डॉ. कल्पना पाटील यांनी तर आभार डॉ. सिंधी भंगाळे यांनी मानले.

विकासाचा घेतला आढावा
साहस कार्यशाळेबद्दल अश्‍विनी कुंभारे, राकेश लोहार, मच्छिंद्रनाथ कोळपे, विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. ए.आय. भंगाळे यांनी विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेतील सहभागाबद्दलची निरीक्षणे नमूद करतांना त्यांच्या जीवनोपयोगी व्यक्तिमत्व विकासाचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी यांनी साहस कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना जे काही चांगले शिकलात त्याचा समाजाच्या विकासासाठी व स्वव्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच कॅशलेस इंडिया या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.