विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांची मार्चमध्ये अखेरची सभा

0

जळगाव । सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक सुरु असुन निवडणुसाठी गुरुवारी 16 फेबु्रवारी मतदान घेण्यात आले. 23 फेबु्रवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागणार असुन जिल्हा परिषदेवर नवनियुक्त सदस्य निवडुन येणार आहे. दरम्यान मात्र जिल्हा परिषदेत 2 मार्च रोजी स्थायी व जलव्यवस्थापन समितीची तर 7 फेबु्रवारी रोजी सर्वसाधारण सभेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पुर्वी निवडणुक होवून नवनियुक्त सदस्य निवडुन येतील मात्र 21 फेबु्रवारी रोजी विद्यमान जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने विद्यमान सदस्यांची ही शेवटची आचार संहिता असणार आहे. शेवटची सभा असल्याने सदस्यांच्या भुमिकेकडे सर्वाचे लक्ष लागुन आहे.

जवळपास सर्वच सदस्यांचा अखेरची सभा
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बहुतांश विद्यमान जिल्हा परिषद सदस्य उमेदवारी करत नसल्याचे दिसुन आले. काही सदस्यांचे पक्षाने तिकीट कापल्याने संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांची ही शेवटची टर्म असणार आहे. 23 फेबु्रवारी रोजी निकाल लागुन नवनियुक्त सदस्य निवडुण येतील. मार्चमध्ये होणार्‍या सभेला जुन्याच जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार आहे. जवळपास सर्वच सदस्यांची ही शेवटची सभा असणार आहे.

शेवटची सभा
21 मार्च रोजी विद्यमान जिल्हा परिषद संपुष्टात येणार असल्याने नवनियुक्त सदस्य जवळपास महिनाभरानंतर जिल्हा परिषदेला नविन अध्यक्ष मिळाणार आहे. विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रयाग कोळी यांचा देखील ही शेवटची सभा असणार आहे. तसेच कोळी यांना उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांची शेवटची टर्म आहे.

दिड महिन्यांनंतर होणार सभा
मिनी विधानसभा संबोधल्या जाणारी जिल्हा परिषद संपुर्ण जिल्ह्याची प्रतिनिधीत्व करत असते. यावर्षी पदवीधर मतदारसंघाअंतर्गत विधानपरिषदेची निवडणुक व जिल्हा परिषदेची निवडणुक झाली असल्याने दोघांचीही आचारसंहिता जवळपास एकाचवेळी लागु झाली. आचारसंहिता लागु झाल्याने गेल्या दिड महिन्यापासुन झेडपीत एकही सभा होवु शकली नाही, त्यामुळे विविध कामे अडकुन होती. अखेर आचार संहिता संपुष्टात येणार असल्याने विकास कामांना गती मिळणार आहे.