विदगावच्या वृध्दासही डिगंबरने लावला ‘चुना’; यावल, अमळनेरला अनेकांना गंडे !

0

जळगाव। मला ओळखले का? मी सुमनबाईंचा नातू, मुलगा, असे म्हणत एखाद्या वृध्द, प्रौढ नागरिकाचा विश्वास संपादन करून किराणा तसेच इतर साहित्य खरेदीचे कारण सांगून काही मिनिटात पैसे करतो, हा फंडा वापरत संशयित डिगंबर मानकर याने बर्हाणपुर, जामनेर, फैजपुर, भुसावळ, जळगावात अनेकांना घडविल्याचे पोलिस चौकशीत समोर आले होते. त्यानंतर या संशयिताने अमळनेर, यावल येथे वृध्दांना गंडविल्याचे समोर आले असून अमळनेर येथे एकाला 11 हजारांचा तर यावल येथे एकाला 44 हजारांचा चुना लावण्याची माहिती मिळाली आली आहे. संशयित हा सध्या जामीनावर सुटाला असून त्याला लवकरच अमळनेर पोलिस ताब्यात घेणार आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी दिली.

डिगंबर मानकर विरोधात फैजपूर येथे एकाला 12 हजार रुपयांत गंडविल्या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. बुधवारी डिंगबर हा जळगावात असल्याची गुप्त माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरिक्षक आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अमित बाविस्कर, गणेश गव्हाळे यांच्या पथकाने सापळा रचून आकाशवाणी चौकातून ताब्यात घेतले होते़ त्याची चौकशी केली असता त्याने फैजपूर येथील गुन्ह्याची कबूली दिली होती़ डिगंबर विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यासह भुसावळ तसेच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, त्या-त्या ठिकाणचा बाजार असला की डिगंबर गावातील बँक शोधायचा. पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकावर लक्ष ठेवून त्यांच्या हातात पैसे पडतात डिगंबर हेरायचा आणि नातेवाईक असल्याचे भासवत विश्वास संपादन करून त्यांना हजारोंचा गंडा घालायचा. डिगंबरने या पध्दतीने जळगाव, भुसावळ, जामनेर, फैजुपर, बर्हाणपुर येथे गंडा घातल्याचे पोलिस चौकशीत समोर आले होते. त्यांनर त्याला पोलिस कोठडी होवून त्याची जामीनावर सुटका झाली आहे.

44 हजारांत गंडविले
बर्हाणपुर, जामनेर, फैजपुर, भुसावळ, जळगावानंतर आता डिगंबर याने यावल, अमळनेर मध्ये देखील सुमनबाईचा मुलगा सांगून दोन जणांना गंडविल्याची माहिती मिळाली आहे. विदगाव येथील वृध्द इसम यावल येथे बैल जोडी विकण्यासाठी गेले होते. बैलजोडी विकल्यानंतर त्यांना त्यातून 44 हजार रुपये मिळाले. हे डिगंबर याच्या लक्षात येताच त्याने वृध्दास हेरून मी सुमनबाईचा मुलगा सांगत वृध्दाचा विश्‍वास संपादन केले. यानंतर दुकानातून वस्तू खरेदी केल्या असून मला पैसे कमी पडता हेत तुम्ही जरा पैसे देता का? मित्र पैसे घेवून येतो आहे, तुम्लाला लगेच पैसे परत करेल असे सांगत डिगंबरने वृध्दाकडून 44 हजार रुपये घेवून वृध्दास एका दुकानावर थांबवून पसार झाला होता. यानंतर अमळनेर येथेही डिंगबर याने बाजाराचा दिवस साधून बँगत पैसे काढण्यासाठी आलेल्या वृध्दास त्याच पध्दतीने हेरून 11 हजारांचा गंडा घातला आहे. यातच डिगंबर हा आता जामीनावर असून त्याला लवकरच अमळनेर पोलिस ताब्यात घेणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.