विज्ञान – फक्त विषय नाही तर प्रोडक्ट्

0

दर वर्षी 28  फेब्रुवारीला आपण राष्ट्रीय विज्ञानदिन जल्लोषाने साजरे करतो, कोण्या जयंती इतका नाही, पण साजरा केला जातो.  आजवर असं कधीच झालं नाही की राज्यात किंवा देशात सर्व नेत्यांसोबत सर्व वैज्ञानिकांची मिटिंग किंवा संमेलन झाले. ना कधी एकत्रितपणे रिसर्च आणि डेव्हलपमेंट बद्दलना कधी समस्यांवर चर्चा. कधी विकासाची भावी रूपरेषा प्रेझेंट झाली नाही. असू द्यात…

बदलत्या काळानुसार विज्ञान हा फक्त आता विषय उरला नसून ते एक हॉट सेलिंग प्रोडक्ट देखील बनत चालले आहे. वर्ल्ड वार २ पासून ज्या देशांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्राथमिकता दिली आज ते देश आर्थिक महासत्ता आहेत.राष्ट्रीय विज्ञान दिना निमित आज या दुसऱ्या ब्लॉग मध्ये पूर्ण रिव्ह्यू देत आहे…

इस्त्रो ने अभिमानास्पद उंच उडी मारली असली तरीही आज विज्ञान आणितंत्रज्ञाना च्या योगदानात  में भारत हा जगात 21व्या क्रमांकावर आहे.या क्रमांकाचा आधार हा असतो की कोणत्या देशाने  वैज्ञानिक शोधांमध्येकिती योगदान केले आहे.हे योगदान रिसर्च पेपर्स वरून ठरते.

विज्ञान आणितंत्रज्ञान क्षेत्रात एखाद्या देशात किती पीएचडी करणारे आहेत यावरून देखील विज्ञानाच्या प्रगतीचा क्रमांक निश्चित केला जातो. यात सध्या तरी भारताची स्थिती फार साधारण आहे. आपल्याकडे सीएसआईआर (Council of Scientific and Industrial Research) सारख्या संस्था आहेत, बरीच रिसर्च सेन्टर्स आहेतआणिविश्वविद्यालयांमध्ये देखील विज्ञान विभाग आहेत, पण सीएसआईआर चा एक सर्वे सांगतो कीदर वर्षी अंदाजे  तीन हजार रिसर्च पेपर्स तयार होतात पण त्यात कोणतीही नवीन आइडिया नसते. वैज्ञानिकतसेच वैज्ञानिक संस्थाची कार्यकुशलतेचेपरिमाण हे वैज्ञानिक शोधपत्रांचे प्रकाशन तसेच पेटेंटची संख्या किती आहे यावरही ठरते पण, या दोन्ही ठिकाणी आपण कासवगतीने चालत आहोत.

भारतातरजिस्टरझालेल्या पेटेंटचीची संख्या देखील फार कमी आहे. रिसर्च आणि डेवलपमेंटवरखर्च वाढतोय पण त्या प्रमाणात त्याचे रिटर्न फार कमी आहेत.मागील 10 वर्षातR & D वर232% वाढ झाली पण त्यातून फारशी फलनिष्पत्ती नाही.मागच्या काही वर्षात भारतात कृषि, जीव विज्ञान, चिकित्सा विज्ञान, रसायन विज्ञान, गणित, भौतिक विज्ञान, इंजीनियरिंगतसेच भू-विज्ञान यांमध्येशोधपत्रांच्या योगादानाचीगती फक्त 3% च्या आसपास आहे.

देशातील विविध वैज्ञानिक संस्थानआणि राष्ट्रीय प्रयोगशाळावरअशा लोकांचे वर्चस्व आहे ज्यांचे कसलेही वैज्ञानिक पार्श्वभूमी नाही किंवा असा शैक्षणिक स्तर नाही की जेणे करून कोण्या वैज्ञानिक संस्थेला एका विशिष्ट पद्धतीनेउल्लेखीनीय कार्य करता येईल.त्यांच्या राजकीय किंवा धनाच्या वर्चस्वमुळे ते तिथले अध्यक्ष बनलेत पण विकासाचे धनी नाही. विज्ञानाच्या क्षेत्रात जोड-तोड च्या गोष्टींनी किंवा राजकीय खेळीनि काहीच निष्पन्न होत नाही. विज्ञान क्षेत्रात काही करण्याचा अर्थ हाच की नवीन शोध किंवा नवीन अविष्कार केल्या जावा.

वैज्ञानिक संस्थानांमध्ये जेंव्हा राजकीय वर्चस्व आणि राजकीय छक्के-पंजे खेळले जातील तोपर्यंत तरी गतिशील विकास होणे शक्य नाही आणि हेच कारण आहे की वैज्ञानिक समुदायात  कुंठा वाढत आहे त्यामुळे कोणी राजेनामे देता आहेत तर कुणी फक्त वेळ आणि दिवस काढत आहेत. हेचकारणे आहेत की ज्यांमुळे भारतीय वैज्ञानिक एक तर विदेशात स्थलांतरित होतात किंवा भारतीय संस्थांपासून अलिप्त राहतात. जवळपास 10 लाख भारतीय वैज्ञानिक, डॉक्टर आणि इंजीनियर आजदेशाच्या बाहेर काम करत आहेत. आज देखील प्रतिभा विदेशात गेल्यामुळे अब्जो रुपयांचे अप्रत्यक्ष नुकसान भारताला होत आहे.

चरक और सुश्रुत यांच्या नंतर  चिकित्सा अनुसंधान क्षेत्रातआपले योगदान १०% देखील नाही. त्याचप्रमाणे भास्कराचार्य आणि आर्यभट्ट यांच्या नंतर  गणित व ज्योतिषविषयातभारताने कोणतीही मौलिक अनुसंधान किंवाअविष्कार केला नाही. अंतरिक्ष अनुसंधान क्षेत्रातआपली गगन भरारी आहे , पणदेशाचे नाव खूप मोठे होईल असा कोणताही शोध / आविष्कार केलेला नाही.

वैज्ञानिकआणि इंजीनियरयांच्या संख्याच्याहिशोबाने  भारत हा जगात तिसऱ्या स्थानावर आहे, पणसर्वच्या सर्व  वैज्ञानिक अभ्यास आणि साहित्य हेपश्चिमी देशांतीलवैज्ञानिकांच्या कार्याने भरलेला आहे.त्यात किंवा त्या अभ्यासक्रमात कुठेही भारातीयांचे नावे नसतात. आज स्वातंत्र्या नंतर इतकी प्रगती असताना आपल्या देशात कोणी रामन, खुराना किंवा साराभाई का नाही? खच्चून वैज्ञानिक आणि इंजिनिअर असूनही वैज्ञानिक प्रगतिसाठीउपयुक्त का वातावरण नाही?

खरं तर, सात-आठ दशक पूर्वीअसं नव्हतं. ब्रिटिश हुकुमशाहीत  परिस्थिति एकदम प्रतिकूल होती पण तरीही भारतानेमोठ-मोठे  वैज्ञानिक दिले. रामानुजम, जगदीश चंद्र बोस, चंद्रशेखर वेंकट रामन, मेघनाद साहा आणि सत्येंद्रनाथ बोस. हेवैज्ञानिकभारतातच काम करत होते पण जगातभारताचा गौरव त्यांनी वाढवला.

पणस्वातंत्र्या नंतर आपण एकही अंतरराष्ट्रीय दर्जाचा वैज्ञानिक का नाही निर्माण करू शकलो याचा विचार करण्याचा दिवस म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन असं मी मानतो. देशातील1138 औद्योगिक अनुसंधान आणि विकास संस्थेतजवळपास साठ हजार वैज्ञानिक कार्यरत आहेतपण, तंत्रज्ञान विकासात त्यांचे योगदान किती टक्के आहे? औद्योगिक क्षेत्रआणि प्रयोगशालांचे अनुसंधान यांच्यामध्ये खास ताळमेळ नाही. वास्तव मध्ये विज्ञान आणितंत्रज्ञान क्षेत्रात विकासासाठी आपल्याकडे इतकाही आर्थिक तुटवडा नाही जितका सांगितला जातो.

तुम्ही पाहिलेले हॉलीवूड चे साय-फाय सिनेमे आठवा…. विश्वबाजाराच्याया युगातआतादेशाच्याउत्पादनाचेस्त्रोत हे अंतरराष्ट्रीय व्यापाराचीवस्तु बनली आहे.ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांना आताधन अर्जित करणाच्यास्रोत स्वीकारल्या जात आहे.पण या नवीन विश्वात स्वामित्वपूर्ण ज्ञानामुळेचही संपदा अर्जित केली जाऊ शकते….

असं नाही की भारतातप्रतिभावान आणि क्षमतावान वैज्ञानिक नाहीत,जेंव्हा-जेंव्हा आव्हानं आलीत तेंव्हा-तेंव्हा  लक्ष्य निर्धारित करून यशाचे टप्पे गाठलेत. रॉकेट, उपग्रह, मिसाइल आणि परमाणु  क्षेत्रात आपल्या वैज्ञानिकानी मिळवलेली शानदार सफलता हेच प्रगतीचे प्रमाण आहे.

राष्ट्रीय विज्ञान दिनी आपण एक वास्तव लक्षात घेतले पाहिजे की जगात इतर देशातील आर्थिक सक्षमतेचे माध्यम हे विज्ञान आणि तंत्रज्ञान बनलेलं आहे. औद्योगिक दृष्टितून विकसनशील किंवा विकसित देशांनी जो विकास केला आहे त्यात जवळपासवन थर्ड हिस्सा हाविज्ञान आणि टेक्नोलॉजी क्षेत्रातून झाला आहे. जगातील आजच्या घडामोडीनुसार देशाच्या  आर्थिक विकासासाठीविज्ञान आणि टेक्नोलॉजीमध्ये सतत सुधार करणे  सोबतचनवीन आविष्कार करणेअत्यंत गरजेचे आहे. जेंव्हा आविष्कार होताततेंव्हा त्यामुळे संपूर्ण औद्योगिक व्यवस्था बदलते.

राष्ट्रीय विज्ञान दिन एक निमत्त आहे जिथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे देशाला असणाऱ्या गरजांप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञानाला रिसर्च साठी प्राथमिकता दिली पाहिजे.

निलेश गोरे
ट्रेनर आणि सायकॉलॉजीकल काउंसलर,
वेलनेस फाऊंडेशन, भुसावळ.
9922851678