विज्ञान प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत सेंट अलॉयसिस प्रथम

0

भुसावळ । शहरात आंतरशालेय विज्ञान प्रश्‍नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सेंट अलॉयसिस हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन करुन हायस्कुलने प्रथम क्रमांक पटकावला. सेंट अलॉयसिस हायस्कुलमध्ये झालेल्या स्पर्धेत सेंट अलॉयसिस हायस्कुल, के. नारखेडे विद्यालय आदी शाळा सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत सेंट अलॉयसिस हायस्कुलला प्रथम पारितोषिक तर के. नारखेडे विद्यालयाला द्वितीत पारितोषिक मिळाले.

विद्यार्थ्यांचा केला सत्कार
यामध्ये शहरातील विविध विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता. यात विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित प्रश्‍नांची योग्य उत्तरे दिली होती. मात्र अलॉयसिस हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी अचुक उत्तरे दिल्यामुळे त्यांनी विजय मिळविला. यात सहभागी स्पर्धकांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सिस्टर अल्फान्सो, सिस्टर फिल्डा, सिस्टर करुणा व शिक्षक बडछापे यांनी कौतुक केले. तसेच त्यांचा शाळेतील एका कार्यक्रमादरम्यान सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी शिक्षिका गुरविंदर कौर छाबडा व सर्व विज्ञान शिक्षकांनी मार्गदर्शन केले.