विज्ञानाचे उपयोग मानवी कल्याणासाठी झाले पाहिजे!

0

जळगाव । ग्रामीण भागातून उद्याचे वैज्ञानिक तयार होण्यासाठी बालपणापासून वैज्ञानिक दृष्टीकोन असणे गरजेचे आहे. तसेच मानवी जीवनाच्या कल्याणासाठी विज्ञानाचा उपयोग व्हायला हवे असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणविभागाचे उपशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले. ते जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत संस्थेच्या शतकोत्तर महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. शहरातील नुतन मराठा मराविद्यालयात सोमवारी 20 रोजी त्यांच्याहस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन वैज्ञानिक पध्दतीने पाण्यावर दिवा पेटवुन अनोख्या पध्दतीने करण्यात आले.

प्रदर्शनातील विषय
ग्रामस्वच्छता अभियान, आपत्ती व्यवस्थापन, ऊर्जा निर्मिती, अंधश्रध्दा निर्मुलन, कृषी तंत्रज्ञान, अन्नभेसळ जनजागृती, प्रदुषण, भौतिक विज्ञान, दळण-वळण, वाहतूक सुरक्षा, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, शुध्द पाण्याचे तत्र, कॅशलेस गावाची संकल्पना, अवैध वाळु उपसावरील उपाय, सौर ऊर्जा निर्मिती, भूमिगत उपसा सिंचन प्रक्रिया, हायड्रोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे चारा निर्मिती, पाण्याच्या दाबाद्वारे हायड्रोलिक जे.सी.बी.मशिनची निर्मिती आदी विषयाचे सादरीकरण विद्यार्थ्यानी विज्ञान प्रदर्शनात केले.

विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या उद्दिष्टाने ग्राह्य धरुन शासनाच्या धोरणाला अनुसरुन असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील होते.

यांची होती उपस्थिती
प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी विकास पाटील, नेतकर उपस्थित होते. जेष्ठ संचालक अ‍ॅड.डी.डी.पाटील, आंनदराव कापसे, किरण सांळुखे, अँड. विजय पाटील, दिपक सुर्यवंशी यांच्यासह प्राचार्य डॉ.एल.ए.पाटील, उपप्राचार्य आर.बी.देशमुख, प्रा.डी.पी.पवार, प्रा.एस.डी.पाटील, प्रा.सुनिल गरुड, आर.एल.निळे, डी.आर.पाटील, एस.आर.पाटील, एन.आर.दाणी, एस.बी.गायकवाड आदी उपस्थित होते.

178 विद्यार्थी सहभागी
शहरी भागातील उपलब्ध सुविधा आणि शहरी भागातील शाळा महाविद्यालयातील इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन असणे साहजीक आहे परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावे यासाठी नुतन मराठा महाविद्यालयात मराठा विद्या प्रसारक मंडळातर्फे संस्थेअतंर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. संस्थेअंतर्गत एकुण 28 शाळेतील 178 विद्यार्थींनी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून उपकरणाची मांडणी करीत सादरीकरण केले.