विजय मिळविण्यासाठी झपाट्याने कामाला लागा

0

रावेर । केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार आहे. या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागात या योजना पोहचविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपाची सत्ता आवश्यक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी झपाट्याने कामाला लागावे, असे आवाहन आमदार एकनाथराव खडसे यांनी केले. रावेर येथे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती सुरेश धनके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी मनोगत व्यक्त केले.

जिल्हा बँक संचालक नंदकिशोर महाजन यांचा उमेदवारी अर्ज
या मेळाव्यास जिल्हा बँक संचालक नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, सरचिटणीस वासुदेव नरवाडे, शिवाजीराव पाटील, सुरेश पाटील, कोकिळा पाटील, रंजना पाटील, प्रल्हाद पाटील, पंचायत समिती सदस्य महेश पाटील आदी उपस्थित होते. या मेळाव्यापुर्वी आमदार एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत जिल्हा बँक संचालक नंदकिशोर महाजन व इतर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.