विजया वसावे यांची उपनिरीक्षक पदासाठी निवड

0

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा मार्गदर्शन केंद्रामधील विजया रायसिंग वसावे या विद्यार्थिनीची पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी निवड झाली असून कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी तिचे अभिनंदन केले.

विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा मार्गदर्शन केंद्रात अनुसूचित जमातीच्या विद्याथ्र्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु आहेत. या केंद्राची विद्यार्थीनी विजया वसावे हिची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी राज्य लोकसेवा आयोगाकडून निवड झाली आहे,त्याबद्दल कुलगुरुंच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्राचे संचालक डॉ.अजय सुरवाडे, समन्वयक प्रा.दीपक सोनवणे उपस्थित होते.

Copy