विक्रीसाठी आणलेली 2 पिस्तुले, 4 काडतुसांसह आरोपी ताब्यात

0

पिंपरी :- विक्रीसाठी आणलेली 2 पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसांसह एका आरोपीस पोलीसांनी सापळा रचून अटक केली आहे. हि कारवाई खेड तालुक्यातील भांबोळी फाटा येथे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने केली आहे. गणेश श्रीमंत चव्हाण (23, रा. देहूगाव) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण परिसरात युनिट तीनचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी एक जण बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कर्मचारी सागर जैनक यांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून सागरला त्या ठिकाणी आल्यानंतर ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन बेकायदेशीर पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. अधिक चौकशी केली असता ती विक्रीसाठी आणली असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलीसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त आर.आर. पाटील, श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक निरीक्षक सतीश कांबळे, कर्मचारी विठ्ठल सानप, गंगाधर चव्हाण, हजरत पठाण, दादा पवार, सचिन मोरे, योगेश्‍वर कोळेकर, जमीर तांबोळी, सागर जैनक यांच्या पथकाने केली.

Copy