विक्रम गोखलेच्या दूरदर्शन मालिकेला प्रा.वा. ना. आंधळे यांचे गीत

0

एरंडोल। सुप्रसिध्द चित्रपट अभिनेते विक्रम गोखले यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आवर्तन’ या स्री जीवनावर आधारित दूरदर्शन मालिकेसाठी एरंडोल येथील सुप्रसिध्द गझलकार तथा लेक वाचवा अभियानाचे पुरस्कर्ते प्रा.वा.ना.आंधळे यांनी शीर्षक गीत लेखन केले आहे.

सदर मालिका सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरून दर शनिवारी 5 वाजून 30 मिनिटांनी 13 मे 2017 पासून प्रसारित होत आहे. या मालिकेचे निर्माता सह्याद्री वाहिनीचे संचालक अश्विनीकुमार असून शीर्षक गीत रवींद्र साठे यांनी गायिले आहे. शंतनू मोघे, अपराजिता मुंजे, सीमा कुलकर्णी, मीना सोनावणे आणि इतर कलाकार या मालिकेत दिसणार आहेत. प्रा.आंधळे यांनी या पूर्वीही डी.डी.किसान दिल्ली वाहिनी गुवाहटी दूरदर्शन वाहिनी व सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित झालेल्या मराठी हिंदी मालिकांसाठी शीर्षक गीत लेखन केलेले आहे. बालभारती, युवकभारती अभ्यासक्रमात प्रा.आंधळेच्या कवितांचा समोवश होत आहे.