विकास दुबे एन्काऊंटर: ‘त्या’गावात पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा

0

कानपूर: आठ पोलिसांचे हत्याकांड घडवणारा गँगस्टर विकास दुबे आज शुक्रवारी सकाळी एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे. आज सकाळी विकासला कानपूरला नेले जात असताना पोलिसांच्या ताफ्यातील एका कारला अपघात झाला. विकास दुबे याच कारमध्ये होता. कार उलटताच त्याने पोलिसांकडील बंदूक घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्याभरापासून पोलिसांना विकास दुबेचा शोध सुरु होता. विकास दुबे मारला गेल्याने त्याच्या बिकरू गावातील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. गावात पेढे वाटप करून विकास दुबेच्या मृत्यूचा आनंद साजरा करण्यात आला.

विकास दुबेने बिकरू गावासह कानपूरमध्ये दहशत निर्माण केली होती. त्याच्या परवानगीशिवाय कोणी ग्रामपंचायत सदस्य देखील होऊ शकत नव्हता. बिकरू गावात गेल्या १५ वर्षापासून ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नव्हती. त्याच्याकडे शंभर कोटींची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे.

Copy