विकास दुबे एन्काऊंटरची पुनरावृत्ती; मुंबईहून यूपीकडेनेतांना गँगस्टरचा मृत्यू

0

गुना: सहा महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटर करण्यात आला. विकास दुबेला मध्य प्रदेशातून अटक करून उत्तर प्रदेशात घेऊन जातांना पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला आणि त्यावेळी पळ काढतांना विकास दुबेला ठार करण्यात आले होते. विकास दुबे एन्काऊंटरची पुनरावृत्ती झाली आहे. मोस्ट वाँटेड गँगस्टरला मुंबईतून अटक करुन उत्तर प्रदेशला नेत असताना मध्य प्रदेशमध्ये पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये त्या गँगस्टरचा मृत्यू झाला आहे. फिरोज अली उर्फ शामी असे या गँगस्टरचे नाव आहे. लखनऊ पोलिसांच्या टीमने शनिवारी फिरोज अलीला नालासोपारा येथील झोपडपट्टीतून अटक केली.

पोलीस त्याला कारने उत्तर प्रदेशला नेत असताना, मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात पोलिसांची कार पलटी झाली. त्यामध्ये फिरोज अलीचा मृत्यू झाला. या अपघातात तीन पोलीसही जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग २६ वर अपघाताची ही घटना घडली. विकास दुबे प्रमाणे एन्काऊंटरप्रमाणे यावर देखील आता शंका उपस्थित होत आहे.

Copy