विकास कामे व मुलभूत सुविधा पुरविण्यास कटिबद्ध राहू

0

एरंडोल । कासोदा-आडगाव जिल्हा परिषद गट क्र.45 सर्वसाधारण महिला या जागेसाठी शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी करत असून माझे पती हिम्मतराव खैरनार हे गेल्या 25 वर्षांपासून राजकाणात सक्रीय असल्याची माहिती सुनंदा हिम्मतराव खैरनार यांनी जनशक्तिशी बोलतांना म्हणाली. ते बोलतांना म्हणाल्या की, माझे पती शिवसेना शाखा प्रमुख, शहर प्रमुख, ग्रा.पं.सद्यास्य, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अशी विविध पदांवर काम करून परिसरातील विकास कामांना हात भार लावला आहे. ते जेव्हा जि.प.सदस्य होते त्या वेळेस कासोदा आडगाव गटातील मुलभूत सुविधा त्यात रस्ते आरोग्य, पिण्याचे पाणी अशा विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला असून आमच्या परिवाराचा परिसरातील सामाजिक कार्यात सुद्धा मोठा सहभाग असून जनतेशी आमचे जिव्हाळ्याचे नाते आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात नेत्रदान शिबीर, आरोग्य तपासणी, बायपास सर्जरी करून घेतल्या आहेत तसेच परीसरात कोणत्याही समस्या असल्या तरी ते सदैव तत्पर असल्याचेही बोलतांना सांगितले.

महिलांच्या अडअडचणी व समस्या सोडविणार
सर्वसाधारण माणसांच्या समस्या आम्ही जवळून पहिले असून त्या सोडवण्यास आम्ही तत्पर तयार असतो. माझ्या मतदार संघात कासोदा, आडगाव, फरकांडे, उमरे, मालखेडा, नांद्खुर्द, चांदनबर्डी, सोनबर्डी, जळू, धारागीर, पळासदड या विविध गावांचा समावेश आहे. यागावांचा सर्वेक्षण करून गावातील महिलांच्या अडीअडचणी व बचत गटाच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करणार तसेच निवडणुकीत मतदारांनी मला निवडून दिल्यास अधिकाधिक विकास कामे व मुलभूत सुविधा पुरविण्यास कटिबद्ध राहू. गेले 25 वर्ष परिसरातील जनतेला आमच्या वरील प्रेम व विश्वास माझ्या बाजूने आहे व तो सतत राहील. याबद्दल माझ्या मनात काडी मात्र शंका नाही.