विंडीजने पाकचा केला सनसनाटी पराभव

0

ब्रिजटाऊन । वेस्ट इंडिजने शेनॉन गॅब्रियलने केलेल्या भेदक मार्‍याच्या जोरावर दुसर्‍या कसोटीत पाकिस्तानवर 106 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या 81 धावांतच आटोपला अवघ्या 81 धावात गडगडला. या विजयाबरोबरच वेस्ट इंडिजने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

पहिल्या डावात 79 धावांनी पिछाडीवर पडलेल्या वेस्ट इंडिजने दुसर्‍या डावात सर्वबाद 268 धावा फटकावत पाकिस्तानसमोर विजयासाठी 188 धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना सरफराज आणि मो. आमीरचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या अन्य फलंदाजानी गॅब्रिअलसमोर नांगी टाकली. गॅब्रिअलने पाच बळीच्या समोर पाकिस्तानकडून सर्वाधिक 23 धावा सर्फराझ अहमदने काढल्या. तर कर्णधार मिसबासह इतर 4 पाकिस्तानी फलंदाज शून्यावर बाद झाले.