वाहतूक विभाग थेट वाहन मालकाच्या घरी जाऊन दंडात्मक कारवाई करणार 

0
वाहतुकीचे नियम मोडले; सात दिवसात 207 जणांवर गुन्हे दाखल
दंड वसूल करण्यासाठी ‘पोलीस आपल्या दारी’ उपक्रम
पिंपरी : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक विभागाकडून तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ई-चलनद्वारे दंड आकारणे, दंड न भरल्यास गुन्हे दाखल करणे अशा प्रकारे ही कारवाई सुरु आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील एक आठवड्यात 207 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नो पार्किंग, राँग साईड, नो एंट्री, ट्रिपल सीट, सिग्नल जम्पिंग असे वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. वाहतूक विभागाकडून करण्यात येणार्‍या कारवाया आणि त्यांचे दंड वसूल करण्यासाठी ‘पोलीस आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एखाद्या वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याबाबत वाहतूक विभाग पुरावे जमा करून थेट वाहन मालकाच्या घरी जाऊन दंडात्मक कारवाई करणार आहे. वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी (दि. 21) 43, शनिवारी 21, रविवारी 9,
रस्त्यावर वाहनांची कोंडी
पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन म्हणाले की, विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तसेच मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते. बेशिस्त वाहतूक केल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी आणि त्यामागे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण अशा भयंकर समस्या निर्माण होतात. वाहतुकीच्या प्रत्येक नियमाचे पालन केल्यास वाहतूक कोंडीसारख्या वाहतुकीच्या समस्या येणार नाहीत. नो पार्किंग, रॉग साईड, नो एंट्री, ट्रिपल सीट, सिग्नल कटिंग अशा लहान लहान चुकांना सुधारून वाहतुकीला शिस्त लागणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. नियम हे आपल्यासाठी असतात. त्यामुळे नियम पाळल्यामुळे आपणच सुरक्षित रहाणार आहोत.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यास भारतीय दंड संहिता कलम 279 नुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे. त्यामध्ये संबंधित वाहन चालकाला सहा महिन्यांपर्यंत कैद होऊ शकते. किंवा एक हजार रुपये दंड होऊ शकतो. किंवा वरील दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्याचबरोबर संबंधित वाहन चालकांवर सरकार दप्तरी गुन्हेगार असा शिक्का बसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.