वाहतूक नियम पाळण्याकरीता लोकांनी मानसिकता बदलणे गरजेचे

0

जळगाव । राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची घटना नेहमीच झाली आहे. अपघातात आज पर्यत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे या सर्व अपघतातून हेल्मेट वापरणे बंधनकारक असल्याने दिसून येते. हेल्मेट वापरणे गरजेचे असुन ते स्वःरक्षणासाठी गरजेचे आहे. स्वरक्षणासाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक असतांना पोलीस प्रशासना कायद्याचा बडगा दाखवुन हेल्मेट सक्ती करणे शोकांतीका आहे. हेल्मेट वापराबाबत सकारात्मक मानसिकता तयार झाली पाहिजेअसे प्रतिपादन पोलिस अधिक्षक जालिंदर सुपेकर यांनी केले. ते रस्ता सुरक्षा अभियान 2017 अंतर्गत जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे सीट बेल्ट व हेल्मेट वापराबाबत आयोजित चर्चासत्रात बोलत होते. यावेळी शहरातील विविध संस्थेचे प्रतिनिधी, राजकीय व्यक्ति उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी चर्चासत्रात प्रश्‍नोत्तराच्या स्वरुपातुन वाहतूक नियमांबाबत सुचना मांडल्या.

यांची होती उपस्थिती

जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित चर्चा सत्रात शहरातील विविध संस्थेचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, राजकीय व्यक्ती उपस्थित होते. तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी, पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, उपनिरीक्षक प्रदिप देशमुख, राज्य मोटार परिवहन मंडळाचे अधिकारी, डॉ.राधेश्याम चौधरी, अमित जगताप, सरिता माळी, गिरीष कुलकर्णी, डॉ.नितीन धांडे, अमोल पाटील, मोहन कुलकर्णी, दिलीप सपकाळे आदी उपस्थित होते.

नागरिकांनी मांडल्या सुचना; प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून संकेचे निरसन

हेल्मेट व सिटबेल्ट वापराबाबत आयोजित चर्चासत्रात शहरातील नागरिकांना वाहतूक नियमांबाबत सुचना मांडल्या. प्रश्‍नोत्तराच्या स्वरुपात झालेल्या चर्चासत्रातुन पोलीस अधिकारींनी समर्पक उत्तर देण्याचे प्रयत्न केले. वाहतूकीचे नियम अधिकाधिक कठोर झाले पाहिजे, ऑटो-रिक्षावर जाहिरात फलक चिपकविल्यास रिक्षाचालकांच्या माध्यमातून वाहतूक नियमांबाबत जानजागृती होण्यास मदत होईल, दंडात्मक कारवाई करीत असतांना पोलीस कर्मचार्‍यांनी पारदर्शक काम करावे, हेल्मेट सक्तीचे करीत असतांना वसुल करण्यात आलेल्या दंडाच्या रकमेतुन हेल्मेट खरेदी करुन पावती द्यावी अशीही सुचना यावेळी नागरिकांनी मांडल्या.

17 फेब्रुवारी पासुन कारवाई

शहरातील राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणार्‍या नागरिकांसाठी हेल्मेट व सिटबेल्टचा वापर करणे आवश्यक असल्याने जिल्हा पोलीस दलातर्फे 10 फेबु्रवारी पासुन हेल्मेटचा वापर न करण्यार्‍यावर दंडात्मक कारवाई करत आहे. 17 फेबु्रवारीपासुन पोलीस पथक महार्गावर थांबुन वाहतुक कारवाई करणार आहे.