वाहतुक पोलीस रिक्षाचालक यांच्यात वाद

0

जळगाव : टॉवर चौकात रिक्षाचालकाने सिग्नल तोडल्याने वाहतुक पोलीसांनी त्याला अडवले. मात्र, रिक्षाचालकाने मेमो न फाडण्यावरून वाहतुक पोलीसांशी वाद घालत हुज्जत घातल्याचा प्रकार सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडला. काही वेळानंतर रिक्षाचालकाला शहर वाहतुक शाखेत नेवून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करत दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सायंकाळीायंकाळी 6 वाजेच्या सुमारास 6 वाजेच्या सुमारास टॉवर चौकात वाहतुक पोलीस ईश्‍वर सोनवणे व चंद्रकांत सोनवणे हे ड्युटीवर होते. सायंकाळी 6.15 वाजेच्या सुमारास एमएच.19.व्ही.8936 वरील रिक्षाचालक अजीम शेख नाजीम (वय-23 रा. गेंदालाल मिल) याने टॉवर चौकातील सिग्नल तोडला.

रिक्षा चालकाने मोडला वाहतूकीचा नियम
टॉवर चौकातील सिग्नलच्या ठिकाणी कार्यरत असलेले सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास दोन्ही वाहतुक पोलीस ईश्‍वर सोनवणे व चंद्रकांत सोनवणे यांच्या समोर रिक्षा चालकाने वाहतूकीचा नियम मोडल्याने त्यांनी त्याला मेमो फाडण्यास सांगितले. परंतू अजीम याने मेमो फाडण्यास नकार दिला. यावरून वाहतुक पोलीस व रिक्षाचालकात बाचाबाची झाली. रिक्षाचालकाने हुज्जत घातल्यानंतर वाहतुक पोलीस कर्मचार्‍यांनी अजीम याला शहर पोलीस ठाण्यात नेले. परंतू रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी शहर वाहतुक पोनि. अनिल देशमुख यांनी पोलीस कर्मचार्‍यांना कार्यालयात बोलवून घेत अजीम याच्यावर दंडात्मक कारवाई करून 200 रुपयांचा दंड वसूल करून सोडून देण्यात आले.