वाहतुक पोलिस बुथचे उद्घाटन

0

जळगाव । शहरात विविध ठिकाणी तयार करण्यात आलेले वाहतुक पोलिस बुथचे रविवारी दुपारी 12 वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. रोटरी जळगाव ईस्ट यांच्यातर्फे शहरातील 20 ठिकाणी वाहतुक पोलिसांसाठी बुथ तयार करण्यात आले आहे.

त्या बुथचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, रोटरीचे प्रांतपाल महेश मोकलकर, स.प्रांतपाल महेंद्र रायसोनी, अध्यक्ष संजय शहा, सचिव विजय लाठी, संजय वाणी, डॉ. नंदन माहेश्‍वरी, राजेश जवाहरानी, डॉ. गोविंद मं9ी, डॉ. मनिष चौधरी, डॉ.जयदिपसिंग छाबडा, डॉ. श्रीधर पाटील, भावेश शहा, प्रदिप ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.