वाहतुकीस अडथळा करणार्‍या दोन रिक्षाचालकांवर कारवाई

0

जळगाव : रस्त्याच्या मध्येच रिक्षा उभी करून वाहतुकीस अडथळा करणार्‍या दोन रिक्षाचालकांवर शनिपेठ पोलीसांनी रविवारी भादवि क. 283 प्रमाणे कारवाई केली. यातच दोन्ही रिक्षा पोलीसांनी जप्त केल्या असून सदर कारवाई शनिमंदिराजवळ करण्यात आली.

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरिक्षक प्राची राजुरकर, पोहेकॉ. संजय शेनफडू, पोनाकॉ.मिलींद कंक अशांचे पथक सकाळी नाकाबंदी करत असतांना शनिपेठ भागाती शनिमंदिर जवळ मिनिडोअर रिक्षा क्रं. एमएच.19. जे. 7279 वरील चालक जितेंद्र वसंत कोळी (वय-32 रा. कांचन नगर) याने रस्त्यातच रिक्षा उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला तर त्याच ठिकाणी रिक्षा क्रं. एमएच.19.बीजे. 1813 वरील चालक विजय पोपट वाणी (वय-60 रा. कांचन नगर) याने देखील शनिमंदिरसमोरील रहदारीच्या रस्त्यात रिक्षा उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतांना आढळुन आला. शनिपेठ पोलीसांच्या पथकाने वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या दोन्ही रिक्षाचालकांवर भादवि क.283 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करून दोन्ही रिक्षा जप्त केल्या आहेत. तसेच न्यायालयातून त्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे.