वाशीतील 19 सी मध्ये बिकानेरवालाचा शुभारंभ

0

मुंबई। अतिशय रुचकर आणि चविष्ट स्वरूपाच्या भारतीय पाककृती महाराष्ट्रात आणण्याचे उद्दिष्ट ठेऊनच भारतातील मिठाया आणि अल्पोपहाराचे रुचकर पदार्थ निर्माण करण्यात आघाडीवर असलेल्या बिकानेर फूड्स प्रा. लिमिटेड या कंपनीने नुकताच नवी मुंबईतील वाशी मध्ये आपल्या पहिल्या दुकान कम उपहारगृहाचा शुभारंभ केला आहे. या शुभारंभाद्वारे कंपनीने प्रथमच महाराष्ट्रात पाऊल रोवत आपला ठसा उमटवला आहे. वाशी येथील सेक्टर 19 सी मध्ये शुभारंभ केले गेलेले बिकानेरवाला कंपनीचे हे उपहारगृह संमिश्र स्वरूपाच्या लोकवस्तीत सुरु केले गेले असून तरुण मंडळी आणि कौटुंबिक सौख्य जपणार्‍या मंडळींना विशेषतः जे पारंपरिक आणि स्वादिष्ट भारतीय भोजनाच्या शोधात असतात अशा मंडळींकरिता हे अतिशय योग्य असे उपहारगृह असणार आहे.

वाशी येथील कंपनीचे दुकान कम उपहारगृह हे सुमारे 8 हजार स्क्वेअर फूट इतके विस्तारित असून या 2 मजली दुकान कम उपहारगृहात साधारणपणे 120 लोक बसण्याची क्षमता आहे . पैकी तळमजल्यावर मिठाया, स्नॅक्स, नमकीन आणि फास्टफूड मिळण्याची सोय आहे तर पहिल्या मजल्यावर उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, पद्धतीचे भोजन, चायनीज तथा कॉन्टिनेन्टल प्रकारचे पदार्थ मिळू शकतात.