वाळूसाठ्याची चौकशी न झाल्यास उपोषणाला बसणार

0

चोपडा । चोपडा तालुका शेतकरी सहकारी सुतगिरणी आवारात प्रस्तावित बांधकामासाठी वाळुसाठा केलेला आहे. सदरील वाळु साठा हा अवैध आहे म्हणून 16 सप्टेंबर 2017 रोजी तहसिलदार दिपक गिरासे यांच्याकडे माहितीचा अधिकारात माहिती मागविण्यात आली होती. त्या अनुषंगाने तहसिलदार दिपक गिरासे यांनी संबंधित शेतकी संघाचा कार्यकारी संचालक यांच्याकडून वाळुसाठा बाबत वाळु परवाना (परमिट) मागविला असून तक्रारदार हेमराज कोळी व पंचभरत बाविस्कर यांना संबंधित माहिती देण्यात आली आहे. परंतु त्या परवान्यावर इनव्हाईस नंबर दिसुन येत नाही, तसेच सदर परवानावर सुतगिरणी असे नाही, त्यामुळे वाळु वाहतूक परवाना खोटे व बनावट असल्याचे शासकीय विश्राम गृहात पत्रकार परीषेदेत भरत बाविस्कर पं.स.सदस्य यांनी सांगितले.

संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करा
वाळु वाहतूक परवाना हा अवैध असताना तहसिलदार गिरासे यांनी संबंधीतांवर कारवाई करण्यास उदासिन दिसुन येत असल्याचे आरोप यावेळी करण्यात आला. अवैध वाळु वाहतूक करणारे सुतगिरणी कार्यकारी संचालकासह संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अवैध वाळु साठा जप्त करावा, या मागणीसाठी तक्रारदार हेमराज कोळी व भरत बाविस्कर हे 13 नोव्हेंबर रोजी तहसिल आवारात आमरण उपोषणास बसणार आहेत, असे पत्रकार परीषदेत सांगितले असून निवेदनाचे प्रति जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

Copy