वाळूच्या ट्रॅक्टरच्या धडकेत हुडकोतील प्रौढ ठार

जळगाव- वाळूच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने भाजीपाला घेवून घरी जाणारा सायकलस्वार जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास खंडेरावनगराजवळील रस्त्यावर घडली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पिंप्राळा हुडकोतील मेहबूब खान अफिस खान (वय ५४) हे एका हार्डवेअरच्या दुकानात कामाला होते. ते भाजीपाला घेण्यासाठी सायकलने खंडेरावनगरात गेले होते. भाजीपाला घेतल्यानंतर घराकडे जात असताना त्यांना वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने धडक दिली. यात ते जागीच ठार झाले. तर चालक ट्रॅक्टर घेवून पसार झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदन झाले. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मयताच्या पश्‍चात पत्नी व दोन मुलं आहेत.