वाल्मिकी समाज संस्थेच्यावतीने विविध पुरस्कार वितरण

0
पिंपरी : वाल्मिकी समाज संस्थेच्यावतीने विद्यार्थी सत्कार व विविध कार्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरव खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आला. थेरगाव येथील कैलाश मंगल कार्यालयात हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी महापौर राहुल जाधव, महात्मा फुले महामंडळाचे महाराष्ट्राचे महाव्यवस्थापक राकेश बैद, नगरसेविका गीता मंचरकर, मनीषा पवार, योगेश बाबर, गजानन चिंचवडे. डॉ.अनुपम बेगी, मेहतर वाल्मिकी महासंघाचे अध्यक्ष कवीराज संघेलिया, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, पिंपरी-चिंचवड मागासवर्गीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मनोज माछरे. अध्यक्ष आबा गोरे, गटनेते कैलास बारणे, कृष्णा माळी, उद्योजक सुनील पायरमल, अखिल बाल्मिकी समाजाचे संस्थापक सोमनाथ बेद, राजु परदेशी, संजय मरकळ, माजी नगरसेवक धनराज बिर्दा, स्वागतअध्यक्ष आनंद खराळे आदी उपस्थित होते. समाजरत्न पुरस्कारात मोहन रामसिंग कंडारे यांना प्रदान करण्यात आला.
विविध पुरस्कारांत देवीदास कच्छोटिया, रणजीत आठवाल, लालबाबुजी गुप्ता, प्रा. नरेंद्र केदारी, नगरसेवक कैलास बारणे, गोविंद दाभाडे, विजय परमार, रामपालजी सौदा, ईश्‍वरभाई वाघेला, अजयजी चांगरे, अ‍ॅड.कबिर बिवाल, कौशल्या मदनलाल चरावंडे, आशा मोटा, रिशिकांत वचकल, नितु दयाल, प्रिया मोहिले, कैलास पुरी, सुनील लांडगे आदींना पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार राजेश बडगुजर यांनी मानले.