वाल्मिकनगरमधील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

0

शिरपूर: शहरातील वाल्मिक नगर येथील महिलेचा २९ मे रोजी कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता. तेव्हापासून महिलेवर धुळे येथे उपचार सुरु होते. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक नगर येथील ६० वर्षीय पॉझिटीव्ह महिलेचा मृत्यू झाला आहे. २ जून रोजी पहाटे महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेच्या मृत्यूमुळे तालुक्यातील कोरोना बाधित मृत्यूची संख्या ५ वर पोहचली आहे.

Copy