वाढदिवस साजरा करणे भोवले; २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील नियमांचे उल्लंघन करीत वाढदिवस साजरा करणार्‍या अयोध्यानगरातील हनुमाननगरात सुमारे २४ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कोरोनाच्या कालावधीत सार्वजनिक कार्यक्रम साजरे करण्यास बंदी असताना अयोध्यानगरातील हनुमान
हनुमाननगरात अनिल लक्ष्मण घुले (रा. रामेश्वर कॉलनी) याचा वाढदिवस २८ रोजी रात्री ८ वाजता साजरा क
रण्यात आला. याबाबत कळताच पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी अनिल घुले याच्यासह कार्यक्रमास
उपस्थित राहणारे सुनील लक्ष्मण घुले (रा.रामेश्वर कॉलनी), रुपेश सोनार (रा.कांचननगर), सोनूसिंग बावरी
(तांबापूर), दत्तू थोरवे (रामेश्वर कॉलनी), मयूर वाणी, संदीप उर्फ राधे शिरसाठ (रामेश्वर कॉलनी), सिकंदर
पटेल (फातेमानगर), पप्पू पांडोळकर (रामेश्वर कॉलनी), विक्की पाटील (अयोध्यानगर), अक्षय पाटील (अपना
घर कॉलनी, अयोध्यानगर), दीपक तरटे (नागसेननगर) यांच्यासह इतर १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
झाला. याबाबत कॉन्स्टेबल सतीश गर्जे यांनी फिर्याद दिली. तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत
आहे.