वाढत्या तापमानाने होळनांथेत जनजीवन झाले विस्कळीत

0

होळनांथे। होळनांथेसह परिसरात तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून मे हिटच्या तडाक्याने तर दुपारच्या वेळेस बाहेर पडणे टाळले जात असून परिणामी बाजारेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून जणू सूर्य आग ओकु लागला असल्याचे जाणवू येत आहे. मानवासह पशुपक्षांवरही वाढत्या तापमानाचा परिणाम दिसून येत आहे. पार्‍याने चाळीशी ओलांडली असून वाढत्या तापमानाने विपरीत परिणाम जाणवून येत आहे.

बाजारपेठेत मंदी : उन्हाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत असून याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. सकाळी 11 वाजेपासूनच बाहेर पडणे टाळू लागले असून ग्रामीण भागातील लोकही शहरात जायचे असल्यास दुपारी 12 वाजेपर्यंत आपले आपटवून परत येण्याच्या प्रयत्नात असतात. वाढत्या तापमानाचा परिणाम व्यावसायीक वर्गावरही झाला असून दुपारच्या वेळेस बाजारपेठेत शुकशुकाट जाणवून येत आहे.

थंडपेयाला वाढती मागणी : वाढत्या तापमानाने अंगाची लाहीलाही होत असून शरीराला गारवा मिळावा म्हणून विविध प्रकारच्या थंउपेयांची मागणी वाढली आहे. परिणामी लिंबू सरबत, कोल्ड्रिंक्स, फळांचा रस, ऊसाचा रस, मसाले ताक व थंड पाण्याची विक्री मात्र तेजीत होत आहे. त्याचप्रमाणे स्कार्फ, टोपी, बागायतदार रूमाल यांचीही मागणी वाढली आहे.

शेती कामाला वेग : तापमानाने 40 शी पार केल्याने उन्हाचा उकाळा चांगलाच जाणवून येत असून वाढत्या उन्हामुळे शेती मशागतीचे कामे करण्यातही अडचणी येत आहेत. शेतमजुरही सकाळी लवकरच शेतावर जावून दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत आपले कामे आपटून घरी येत आहेत.

पर्यवरणाचे समतोल राखणे गरजेचे : वाढत्या उन्हाचे मुख्य कारण पर्यावरणाचे समतोल ढासाळले असून सर्वत्र वृक्षतोउ होतांना दिसून येत आहे. मुख्य रस्त्यावरील उभा वृक्षांना जाळण्याचे प्रकार तालुक्यासह सर्वत्र दिसून येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.