Private Advt

वाडी शिवारातून ईलेक्ट्रिक सामानांची चोरी

जामनेर : तालुक्यातील वाडी शिवारातून शेताच्या विहिरीवरून असलेले वायर, स्टार्टर, पेटी व इलेक्ट्रिक सामान मिळून 10 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
सतीश रामदास चौधरी (45, शेलवड, ता.बोदवड) यांचे जामनेर तालुक्यातील वाडी शिवारात शेत आहे. त्यांच्या शेतातील विहिरीजवळ त्यांनी ठेवलेले 10 हजार 500 रुपये किंमतीची 120 फूट वायर, स्टार्टर, पेटी व इलेक्ट्रिक सामान असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने 21 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 22 मार्च सकाळी 9 वाजेच्या दरम्यान चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यावर सतीश चौधरी यांनी तातडीने जामनेर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करीत आहेत.