वाडीतील पाच वर्षीय मुलीवर बिबट्याच्या हल्ला

0

नंदुरबार। तालुक्यातील तुळाजा येथील येथील पाच वर्षीय मुलीवर शहादा तालुक्यातील वाडी पुनर्वसन येथे बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या भागात पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकरी , शेतमजुरांमध्ये घबराट पसरली आहे, जखमी असलेल्या मुलीला उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सातपुते, स्विय सहायक विरसिग पाडवी, व तुळाजा ग्रामस्थ उपस्थित होते.

Copy