वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करणार

0

चोपडा । नगर वाचन मंदिर भविष्यात ई लायब्ररी, वाचन कट्टा सारखे उपक्रम राबवून वाचन संस्कृती कशी वाढीस लागेल यासाठी झटणार आहे. तसेच उत्तम वाचक म्हणून देखील पुरस्कार देणार आहे. खान्देशात प्रख्यात असलेली व्याख्यानमाला यंदा 51 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यामुळे अविस्मरणीय वक्ते आणण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे उद्योजक आशिष गुजराथी यांनी सांगितले. तालुका वाचनालय नगर वाचन मंदिराच्या सर्वसाधारण सभेत गुजराथी बोलत होते. यावेळी प्रास्तविक व अहवाल वाचन कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी केले. तर आर्थिक पत्रकांचे वाचन कार्यवाह डॅा.परेश टिल्लू यांनी केले. याप्रसंगी संस्थेच्या निवृत्त झालेल्या सहग्रंथपाल वंदना जोशी यांचा सत्कार आशिष गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आला.

सभेत यांची होती उपस्थिती
सभेत नऊ विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात अविनाश कुलकर्णी, प्रकाश पोतदार, व्ही.एस.पाटील, विलास पाटील, श्रीमती खैरनार आदिंनी सहभाग घेतला. यावेळी मंचावर नगराध्यक्षा मनिषा चौधरी, संस्थेचे उपाध्याक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी, हजर होते. तर यावेळी संचालक सोमनाथ बडगुजर, चंद्रहास गुजराथी, मोरेश्‍वर देसाई, अ‍ॅड.अशोक जैन, श्रीकांत नेवे, विजयालक्ष्मी रिखे, धिरेंद्र जैन, प्रभाकर महाजन, प्रफुल्ल गुजराथी, किरण गुजराथी आदि उपस्थित होते. आभार गोविंद गुजराथी यांनी मानले.

Copy