Private Advt

वाघोद्याजवळ काळ्या बाजारात जाणारा पावणेदोन लाखांचा तांदुळ जप्त

सावदा : काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने जाणारा शासकीय धान्य दुकानातून विक्री होणारा तब्बल एक लाख 72 हजारांचा तांदुळ सावदा पोलिसांनी गोपनीय माहितीवरून पकडला आहे. पोलिसांना पाहताच ट्रक चालकाने वाहन सोडून पळ काढला. सोमवार, 27 डिसेंबर 2021 रोजी रात्री 10.55 वाजेच्या सुमारास वाघोदा बु.॥ येथे प्रगती टोल काट्याजवळ ही कारवाई करण्यात आली. 98 किंटल तांदुळ विविध रंगाच्या प्लास्टीक गोण्यांमध्ये आढळला आहे. पोलिसांनी चार लाख रुपये किंमतीचा मालवाहू ट्रक (एम.एच.19 झेड.1274) व एक लाख 72 हजार रुपये किंमतीचा तांदुळ जप्त केल्याप्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात पोलिस नाईक मेहरबान बशीर तडवी यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आाल. अधिक तपास सहा.पोलिस निरीक्षक देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड करीत आहेत.