Private Advt

वाघोदा पुलावरील निकृष्ट काम बंद ; ‘जनशक्ती’ची दखल

रावेर : वाघोदानजीक बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर पुलाच्या संरक्षणासाठी निकृष्ट दर्जाची माती मिक्स भिंतीचे निकृष्ट काम सुरू होते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता इम्रान शेख यांचे जाणून-बुजुन दुर्लक्ष होत असल्याने ‘दैनिक जनशक्ती’ या संदर्भात वृत्त झळकताच तातडीने निकृष्ट काम थांबवण्यात आले. निकृष्ट वाळूमुळे कामाचा गुणवत्तेचा दर्जा घसरत असून याकडे सावर्जनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी केली जात होती. सुरुवातीला सुध्दा कामात मातीमिक्स वाळू वापरण्यात आली त्यामुळे या संपूर्ण कामाची गुणवत्ता नियंत्रक विभागाकडून (क्वॉलिटी कंट्रोल) चौकशी करण्याची मागणी होत आहे.

काम तातडीने थांबवले : व्ही.के.तायडे
वाघोदा पुलाच्या संरक्षणासाठी निकृष्ट वाळूचा वापर होत असल्याच्या वृत्ताची दखल घेऊन संबधित ठेकेदाराला काम थांबवण्याचे आदेश दिले असून मी स्वत:हा कामाच्या ठिकाणी जाऊन चौकशी करणार आहे. तसेच आतापर्यंत केलेल्या कामातदेखील निकृष्ट वाळूचा वापर केला असेल तर त्याचीदेखील चौकशी केल्यानंतर पुढील काम सुरू केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व्ही.के.तायडे यांनी ‘जनशक्ती’शी बोलतांना सांगितले.