Private Advt

वाघळीतील तरुण गावठी कट्ट्यासह पोलिसांच्या जाळ्यात

चाळीसगाव : तालुक्यातील वाघळी गावातील तरुणाला बेकायदेशीर गावठी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. आकाश अमृत शिरसाठ (28, वाघळी, ता.चाळीसगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लोकेश पवार यांना तालुक्यातील वाघळी गावात जुन्या चांभार्डी रोडलगत बेघर वस्तीत असलेल्या तरुणाकडे गावठी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुस असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यासह गोवर्धन बोरसे, नितीन आमोदकर, शांताराम पवार, दत्तात्रय महाजन, जयंत सपकाळे आदींनी छापा टाकून कारवाई केली. गावठी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतूस मिळून एकूण 26 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर आकाश अमृत शिरसाठ (28, रा. वाघळी, ता.चाळीसगाव) यास अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रमेश चव्हाण, एपीआय धरमसिंग सुंदरडे, उपनिरीक्षक लोकेश पवार, गोवर्धन बोरसे, नितीन आमोदकर, शांताराम पवार, दत्तात्रय महाजन, जयंत सपकाळे आदींनी केली. दरम्यान, जयंत सपकाळे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास एपीआय रमेश चव्हाण व शांताराम पवार हे करीत आहेत.