Private Advt

वाघळीतील कट्टा बाळगणार्‍या आरोपीला दोन दिवसांची कोठडी

चाळीसगाव :  तालुक्यातील वाघळी येथील आकाश अमृत शिरसाठ (28, वाघळी, ता.चाळीसगाव) या तरुणाकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतूस मिळून एकूण 26 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. आरोपी विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास बुधवारी चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची अर्थात 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, पोलिस कोठडीत आरोपींनी कट्टा नेमका का खरेदी केला व पुरवठा नेमका कोण? याचा उलगडा होणार आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास एपीआय रमेश चव्हाण व शांताराम पवार हे करीत आहेत.