वाघले येथे दोघांना लोखंडी गजाने मारहाण

0

चाळीसगाव : कोर्टात चालू असलेली जुनी केस मागे घ्यावी या कारणावरून तालुक्यातील वाघले येथे एकाच्या पायावर लोखंडी गज मारून दुखापत केली तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पत्नी व मुलगा यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तालुक्यातील वाघले येथे घडली असून वैद्यकीय अहवालानंतर दि 11 डिसेंबर 2016 रोजी रात्री चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी
मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम रुपचंद परदेशी (41,रा. वाघले ता. चाळीसगाव) यांनी कोर्टामध्ये दाखल केलेली जुनी केसमागे घेऊन मिटवून टाकावी या कारणावरून 6 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास वाघले गावी त्यांचे घरासमोर आरोपी गोकुळ श्रावण परदेशी याने त्यांना पकडून ठेवले. भैयासाहेब श्रावण परदेशी याने त्याच्या हातातील लोखंडी गज राजाराम परदेशी यांच्या डाव्या पायाच्या पोटरीवर व पंजावर मारून गंभीर दुखापत केली तसेच भांडण सोडविण्यासाठी त्यांची पत्नी सौ सुरेखा परदेशी व मुलगा हर्षल परदेशी हे आले असता त्यांना गोकुळ लक्ष्मण परदेशी व रंजनबाई गोकुळ परदेशी यांना मारहाण करून शिवीगाळ केली, तर मुलगा हर्षल यास जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी वैद्यकीय अहवालावरून 11 डिसेंबर 2016 रोजी रात्री वरील आरोपींविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला भाग 5 गु.र.नं. 126/2016 भा.द.वि कलम 324, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनंत चौधरी करीत आहेत. जखमी राजाराम परदेशी यांचे वर येथील कर्तारसिंग परदेशी यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाल्याचे समजते.