वाकडमध्ये तरुणावर कोयत्याने वार

0

वाकड : चहा पिण्यासाठी चहाच्या गाडीवर थांबलेल्या तरुणीवर तिघांनी मिळून लोखंडी कोयत्याने खांद्यावर वार केले. ही घटना सोमवारी घडली. महेश शहादेव पटेकर (वय 22, रा. म्हातोबानगर, वाकड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार किरण घाडगे, रवींद्र घाडगे, अशोक तुपेरे (सर्व रा. म्हातोबानगर, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या मा हितीनुसार, फिर्यादी महेश चहा पिण्यासाठी चौधरी पार्क जवळ असलेली चहाच्या गाडीवर थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले आणि त्यांनी महेश यांना शिवीगाळ करून हाताने, बांबूने मारहाण केली. तसेच लोखंडी कोयत्याने महेश यांच्या खांद्यावर वार केले. यामध्ये महेश जखमी झाले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.