वाकडच्या एकाने घातला तब्बल 27 लाखांचा गंडा

0

शेअर मार्केटमध्ये गुंतविण्यास सांगितले पैसे

पिंपरी-चिंचवड : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास तुमचा फायदा करुन चांगला परतावा मिळवून देतो, असे सांगून पटणा येथील एकाने चार नागरिकांना तब्बल 22 लाख 10 हजार 329 रुपयांना गंडा घातला आहे. ही घटना 2015 ते जुन 2017 या कालावधीत गणेशनगर रोड, वाकड येथे घडली. हर्षनीत पल्लव सुनिल कुमार दुबे उर्फ हर्षनीत भारव्दाज (वय 26, रा. प्रभात कॉलनी, शंकर कलाटेनगर वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सहा जणांची फसगत
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हर्षनीत याने फिर्यादी आणि साक्षीदार यांना स्वत:चे पाटणा येथे हॉटेल आणि पेट्रोल पंप व बांधकामाचा व्यवसाय असल्याचे सांगून विश्‍वास संपादन केला. तसेच त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून वेळोवेळी प्रसाद वाघमारे यांच्याकडून 6 लाख 46 हजार 833 रुपये व 5 लाख 23 हजार 496 रुपये, मार्शल बावतीस गोंडद याच्याकडून 6 लाख रुपये, राहुल सोमनाथ गायकवाड याच्याकडून 2 लाख 70 हजार तसेच ज्ञानेश्वर निर्मळ याच्याकडून 80 हजार रुपये, ज्ञानदेव मोरे यांच्या कडून 1 लाख 70 हजार रुपये, प्रशांत वाघमारे यांच्या कडून 5 लाख रुपये असे एकूण 27 लाख 99 हजार रुपये घेऊन ती रक्कम परत न करता त्यांची आर्थीक फसवणूक केली आहे. बराच काळ उलटूनही परतावा न मिळत असल्याने फिर्यादी यांनी आरोपी हर्षनीत याच्या विरोधात वाकड पोलीसात ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी हर्षनीत याला तातडीने अटक केली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

Copy