वांद्रे यांच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती

0

जळगाव । महिला व बाल कल्याण विभागामार्फेत राबविलेल्या योजनांच्या अंतर्गत साहित्य खरेदी करण्यात आले होते. याअंतर्गत खरेदी केलेल्या साहित्यामध्ये वित्तीय अनियमितता आढल्याने मुख्य लेखापरिक्षक यांनी चौकशी केली होती. हा चौकशी अहवालानुसार महिला व बाल कल्याण विभागाकडील विद्यमान व तात्कलीन अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून 9 लाख 25 हजार रूपयांची वसूली करणे तसेच एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करणेबाबत व वसूल करणेबाबतचा आदेश अस्थापना विभागाने29 ऑगस्ट 2016 रोजी पारीत करण्यात आला होता. या आदेशावर प्रभारी मुख्यलेखाधिकारी चंद्रकांत वांद्रे यांनी स्थायी समितीपुढे अपिल केले होते.

महिला व बालकल्याण विभागाच्या खरेदीत अनियमितता
वांद्रे यांनी अपिल केल्याने स्थायी समितीने 23 सप्टेंबर 2016 रोजी महिला व बाल कल्याण विभागामार्फेत राबविलेल्या योजनांच्या अंतर्गत केलेल्या खरेदी साहित्यामध्ये अनियमीतता झाल्यामुळे पुन्हा चौकशी करण्याचा ठराव क्र. 531 पारीत केला होता. परंतु, अशा प्रकारचे अपिल करता येत नसल्याने हा ठराव कार्यवाहीत आणून नये व तो विखंडीतसाठी पाठवावा असे आदेश आयुक्त जीवन सोनवणे यांनी प्रभारी मुख्यलेखा परिक्षक निरंजन सैंदाणे यांना दिले आहेत. चंद्रकांत वांद्रे हे अनियमीतता झाल्याच्या काळात महिला व बाल कल्याण विभागात कार्यरत होते का किंवा नाही ह्या एक मुद्याच्या चौकशीसाठी मुख्यलेखा परीक्षक यांची एक सदस्यीय समिती आयुक्तांनी नेमली आहे. चौकशी समितीस 15 मे पर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन जर वांद्रे त्यावेळी कार्यरत नसतील तर कोण कार्यरत होते याची माहिती या अहवालाद्वारे मागण्यात आली आहे.