वस्तूंची खरेदी करतांना पक्के बील घेण्याचे प्रशासनाने केले आवाहन

0

चोपडा/रावेर । येथील तहसिल कार्यालयाच्या आवारात जागतिक ग्राहक दिन प्रकाश दलाल यांचा अध्यक्षतेखाली व केतनकुमार बोंडे शाखा प्रबंधक बँक आँफ इडिया चोपडा,पो नि किसनराव नजन पाटिल सुधीर निकम, अमृतराव सचदेव, व्ही.सी.गुजराथी, केदारनाथ पाटिल, प्रविण पाटिल, निलेश पालिवाल यांचा प्रमुख उपस्थीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रारंभ दिपप्रज्वलन व सरस्वती, स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. मान्यवराचा सत्कार तहसिलदार दिपक गिरासे प्रभारी पुरवठाधिकारी महेश साळुंखे, डी.एम. नेतकर यांनी केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी तहसिलदार दिपक गिरासे यांनी आपल्या मनोगता ईन्टरनेट बँकींगचा वापर करतांना ग्राहकानी काळजी घेणं गरजे आहे तसेच ग्राहकांनी कुठल बिल घेण महत्वाच आहे. यावर मार्गदर्शन करून पुढील ग्राहक दिन हा ग्रामिण भागात साजरा करू म्हणजे ग्रामिण भागातील जनतेलाही त्याचा लाभ मिळेल असे यावेळी सांगितले. यावेळी प्रकाश दलाल केतनकुमार बोंडे शाखा प्रबंधक बँक आँफ इडिया चोपडा, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटिल, सुधीर निकम, अमृतराव सचदेव, केदारनाथ पाटिल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक व सुत्रसंचालन अनिलकुमार पालिवाल यांनी केले तर आभार प्रभारी पुरवठाधिकारी महेश साळुंखे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीसाठी डी.एम. नेतकर, आर.के.पाटील, एस.आर. कांबळे, निलेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

वस्तुची खरेदी करताना पक्के बिल घ्या – तहसिलदार ढगे
रावेर । कोणतीही वस्तु खरेदी करतांना दुकानदाराकडून पक्के बिल घ्या बिल नसल्यास आपल्याला कुठेही न्याय मागता येत नाही त्यामुळे ग्राहकांनी वस्तुची खरेदी करताना न विसरता पक्के बिल घेणे आवश्यक आहे. यामुळे फसवणूक झाल्यास आपण याविरुध्द दाद मागून न्याय मिळवू शकतो असे प्रतिपादन तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी केले. येथील नवीन तहसील कार्यालय जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी तहसिलदार ढगे बोलत होते. यावेळी गॅस सिलेंडर, इलेक्टॉनिक वजनकाटा, सोने चांदिचे वजन काट्यांचे माहिती दर्शविणारे फलक येथे लावण्यात आले होते.

यावेळी पंचायत समितीच्या सभापती माधुरी नेमाडे, नगरसेवक अ‍ॅड. सुरज चौधरी, दिलीप कांबळे, अशोक शिंदे, प्रशांत बोरकर, आर.बी. महाजन आदींनी मनोगत व्यक्त केले. तर पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, गोपाळ नेमाळे, प्रेमचंद गांधी, विठ्ठल पाटील, मोहन महाजन, पुरवठा अधिकारी तरसोदे, नायब तहसीलदार सी.एच. पाटील, देविदास महाजन आदींची उपस्थिती होती.