वसतिगृह, खोली करून राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अभाविप मदतीचा हात

0

तीन दिवसापासून मोफत भोजन वाटप

जळगाव : राज्यासह देशात कोरोना विषाणूमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉक डाऊन ची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध महाविद्यालयात शिक्षणासाठी विविध राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील काही विद्यार्थी कोरोना महामारीच्या संकट काळात आपल्या गावी जाऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना जेवणाची मोठी अडचण निर्माण झाली आहे.अशा विद्यार्थ्यांना शहरातील अभाविप तर्फे गेल्या तीन दिवसांपासून मोफत जेवण वाटप करण्यात येत आहे.

विविध भागात होत आहे भोजन वाटप

अभाविपचे कार्यकर्ते शहरातील विविध भागातील विद्यार्थ्यांच्या खोली, वसतिगृहात जात भोजन वाटप करण्यात येत आहे. शहरातील वसतिगृहात जम्मू काश्मीर तसेच राज्यातील विविध भागातील19 विद्यार्थी अडकले आहे. या विद्यार्थ्यांना गेल्या तीन दिवसांपासून मोफत भोजन वाटप करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन शहरात बाहेरील राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणाच्या अडचणी येत असतील तर अशा विद्यार्थ्यांनी अभाविपचे हर्षल तांबट – 7276167299, सिद्धेश्वर लटपटे- 83900 22830 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Copy